'पुढचं पाऊल' मधील कल्याणीला जीवे मारण्याची धमकी

'पुढचं पाऊल' या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेली कल्याणी म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे.

Updated: Jul 13, 2015, 12:29 PM IST
'पुढचं पाऊल' मधील कल्याणीला जीवे मारण्याची धमकी title=

मुंबई : 'पुढचं पाऊल' या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेली कल्याणी म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे.

जुई तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कर्जतला तिच्या घरी गेली होती. तिथेच एका लहान मुलाने तिला हे पत्र आणून दिले.  २० जुलै रोजी मी जुईला संपवून टाकणार आहे. पोलिसांना कळवले तर कुटूंबाची पण तीच हालत करेन. अशा आशयाचे निनावी पत्र तिला मिळाले आहे.

यामुळे जुई सध्या फारच दडपणाखाली वावरत आहे. शुटिंग करतानाही ती प्रचंड तणावात असते. या प्रकरणी तिने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हे पत्र कुठून आले, कोणी पाठवले, पाठवण्यामागील कारण अद्यापी समोर आलेले नाही. दरम्यान, पोलीस तपास करत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.