मुंबई : बॉलिवूडमधील तिन्ही खान सलमान, अमीर आणि शाहरूख हे परस्परांचे चांगले मित्र आहेत. पण या तिन्ही खानांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच स्पर्धा पहायला मिळते. पण भविष्यात प्रेक्षकांना एखाद्या चित्रपटात तिन्ही खान एकत्र काम करतांना दिसतील.
यासंबंधी बोलताना अमिर खान म्हणाला की, सलमान आणि शाहरूख बरोबर काम करण्याची संधी मिळाली तर मी काम करण्यास तयार आहे. जर एखाद्या चित्रपटाची पटकथा आम्हाला तिघांना आवडली तर कदाचित आम्ही एकत्र काम करतांना दिसू, असे अमीरने यावेळी सांगितले.
एकत्र काम करायचं नाही, अस काही आम्ही ठरवलेल नाही. कदाचित भविष्यात आम्ही एकत्र काम करू, असे अमीर यावेळी म्हणाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.