'वन्स अपोन अ टाईम इन बिहार'मध्ये राज ठाकरेंवर ताशेरे?

'वन्स अपोन अ टाईम इन बिहार', हा सिनेमा नितु चंद्रा यांची निर्मिती आहे.

Updated: Oct 14, 2015, 01:34 PM IST

मुंबई : 'वन्स अपोन अ टाईम इन बिहार', हा सिनेमा नितु चंद्रा यांची निर्मिती आहे. बिहारच्या युवकांना मुंबईत येणे का भाग पडतंय, बिहारची राजकीय परिस्थिती याला जबाबदार आहे का? यावर या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे.

मात्र एका दृष्टीकोनातून राज ठाकरे यांनी आजपर्यंत जो मुद्दा लावला होता की, बिहार आणि यूपीतील नेते तेथील लोकांसाठी काहीही करत नाहीत, विकास करत नाहीत, म्हणून त्यांना मुंबईत येणे भाग पडते, हाच आशय दिग्दर्शकाने घेतल्याचं दिसून आलं आहे.

या चित्रपटाच्या प्रोमोत 'छात्र नेता' राज ठाकरे यांना म्हणण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी मुंबईत बिहारमधून आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं प्रोमोत दाखवण्यात आलं आहे. 

पण प्रोमोतील राज ठाकरे हे मनसेचे राज ठाकरे नसले, तरी या घटनेवरील संदर्भ सर्वांना माहित आहे. तसेच प्रोमोत सत्य घटनांवर आधारीत सिनेमा असल्याचं म्हटलंय. 

एकदंरीत राज ठाकरे यांची प्रतिमा या सिनेमात कशी मांडण्यात आलीय. हे सिनेमा पाहून ठरणार आहे, पण प्रोमोतून राज ठाकरे यांची भूमिका बिहारी दिग्दर्शकाने उचलून धरल्याचं सुरूवातीला तरी स्पष्ट होतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.