आमिरच्या 'दंगल' सिनेमातील दुसरे गाणे रिलीज

Updated: Nov 23, 2016, 01:16 PM IST

 

मुंबई : मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या बहुप्रतिक्षित दंगल या सिनेमातील दुसरे गाणे रिलीज झालेय. यात गीता फोगट आणि बबिता यांचा कुस्तीतील प्रवास दाखवण्यात आलाय. प्रीतम यांनी संगीत दिलेय तर रफ्तार यांनी हे गाणं गायलंय. पहिल्या गाण्याप्रमाणेच याही गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.