मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिजनेसमॅन राज कुंद्र यांचा लग्नाचा आज ७ वा वाढदिवस आहे. २२ नोव्हेंबर २००९ ला दोघं विवाहबंधनात अडकले होते. शिल्पा शेट्टीने आजच्या दिवशी राज कुंद्रासाठी एक मॅसेज लिहिला आहे. ती म्हणते की, “Whoa! 7 yrs..Happy Anniversary @therajkundra “I have found my Home in your Heart and Love in your Soul.” I’m the luckiest girl in the world. #hubbylove #soulmate.
आज राज कुंद्रा हे देश-विदेशात एक परिचित नाव आहे. भारताचे लोकं त्यांना बिजनेसमॅनपेक्षा अधिक शिल्पा शेट्टीचा पती या रुपात ओळखतात. राज कुंद्राची संपत्ती 2400 कोटी आहे. पण यामागे काही इतिहास आहे. एक शाल विकणारा व्यक्ती बिजनेसमॅन कसा होतो हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
राज कुंद्रा यांनी स्वत: एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती. आज मी जे सुखाचं जीवन जगतोय पण लहानपणी माझं जीवन याच्या उलट होतं. आज त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्या आधी एक स्वप्न होत्या.
मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आर्थिक बाजू इतकी सक्षम नव्हती. लहानपणापासूनच त्याला पैशाची किंमत माहित होती. जेव्हा ते १८ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की, एकतर आपलं रेस्टोरेंट चालव किंवा स्वत:चं काहीतरी काम सुरु कर. राज कुंद्रा यांनी ही गोष्टी गंभीरपणे घेतली.
खिशात काही पैश घेऊन राज कुंद्रा दुबईला गेले. तेथे त्यांनी काही हिरा व्यापाऱ्यांशी चर्चा केली. पण काही यश नाही मिळालं. त्यानंतर ते नेपाळला गेले. तेथे काही पशमीना शाल त्यांनी खरेदी केल्या आणि ब्रिटेनच्या काही ब्रँडेड दुकानांमध्ये विकल्या. जितक्या लवकर त्यांचा व्यवसाय वाढला तितक्याच लवकर स्पर्धा देखील वाढली. त्यानंतर हिऱ्याच्या व्यापारासाठी ते पुन्हा दुबईला गेले.
राज कुंद्रा यांनी त्यानंतर कधी मागे वळून नाही पाहिलं. आज ते वेगवेगळ्या १० कंपन्यांमध्ये मालक आहेत. राज कुंद्राला २००४ मध्ये एका ब्रिटिश मॅगजीनने सगळ्यात श्रीमंत आशियातील ब्रिटिश लिस्टमध्ये 198 वं स्थान दिलं. आयपीएलमध्ये देखील ते राजस्थान रॉयलचे मालक होते.