व्हिडिओ : सोनाक्षीचा मॉडर्न 'राधा डान्स'!

तेवर या आगामी सिनेमात अर्जुनची हिरोईन आहे दबंगगर्ल सोनाक्षी सिन्हा. या सिनेमात सोनाक्षीनेही आलिया भट्ट प्रमाणेच राधा डान्स केलाय..स्टुडंस्ट ऑफ द इअर मधलं राधा तेरी चुनरी हे गाणं हिट झालं होतं. आणि त्यानंतर आता सोनाक्षीनेही राधा गाण्यावर धमाल डान्स केलाय. एक खास रिपोर्ट.

Updated: Jan 9, 2015, 07:44 AM IST
व्हिडिओ : सोनाक्षीचा मॉडर्न 'राधा डान्स'! title=

मुंबई : तेवर या आगामी सिनेमात अर्जुनची हिरोईन आहे दबंगगर्ल सोनाक्षी सिन्हा. या सिनेमात सोनाक्षीनेही आलिया भट्ट प्रमाणेच राधा डान्स केलाय..स्टुडंस्ट ऑफ द इअर मधलं राधा तेरी चुनरी हे गाणं हिट झालं होतं. आणि त्यानंतर आता सोनाक्षीनेही राधा गाण्यावर धमाल डान्स केलाय. एक खास रिपोर्ट.

तेवर सिनेमात अर्जुन कपूर प्रमाणेच सोनाक्षी सिन्हाची महत्वाची भूमिका आहे. अर्जुन आणि सोनाक्षी तेवरच्या माध्यमातून प्रथमच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.सोनाक्षी या सिनेमाचा एक भाग असावी असा आग्रह अर्जुनने धरला होता आणि त्यामुळेच तेवरमध्ये तिला भूमिका मिळाली. अर्जुन सोबत काम करतांना मात्र सोनाक्षीने धमाल केली.

तेवरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोनाक्षीने सिनेमासाठी प्रथमच गाणं गायलं असून तेवरमध्ये सोनाक्षीच्या अभिनयासोबतच तिचं गायणही ऐकायला मिळणार आहे..तिला लहानपणापासून गायनची आवड असून आपली गायनाची हौस तेवरच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचं सोनाक्षीचं म्हणनं आहे

तेवर हे सिनेमाचं नाव असून तेवर म्हणजे काय असं जेव्हा आम्ही सोनाक्षीला विचारलं तेव्हा तिने हे उत्तर दिलं.एका वेगळ्या अर्थाने तेवर तुम्हाला या सिनेमातून पहायला मिळेल असं सोनाक्षीचं म्हणनं आहे. पण या तेवर सोबतच सोनाक्षीने बॉलिवूडच्या राधा साँग क्लबमध्ये एन्ट्री घेतलीय.

बॉलिवूडमध्ये राधा साँगची सध्या चांगलीच चलती आहे..यापूर्वी अलीय भट्टने हे साँग केलं आहे आणि ते जबरदस्त हिट झालं होतं. आता सोनाक्षी राधा साँग घेवून येतेय. तेवरमधलं हे राधा साँगचं म्युझिक ठेका धराय लावणारं आहे.

आलिया प्रमाणेच सोनाक्षीचा हा राधा अंदाज प्रेक्षकांना भावल्याशिवाय राहणार नाही. कारण ही राधा म़ॉडर्न आहे.तिची अदा आणि अंदाजही मॉडर्न आहे.

व्हिडिओ पाहा :-

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.