मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा आज वाढदिवस... 42 व्या वाढदिवसाला हृतिकला अनेकांनी शुभेच्छा दिल्यात.
या सर्व शुभेच्छांमध्ये उल्लेखनीय ठरल्या त्या हृतिकची माजी पत्नी सुझान खान हिनं दिलेल्या शुभेच्छा... सुझाननं हृतिकसोबतचा आपला एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
घटस्फोट घेतल्यानंतरही हृतिक आणि सुझान यांच्या नात्यात कटूता आलेली नाही, हे विशेष... अनेकदा आपल्या मुलांसोबत या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. दोघांनी सोबतच नवीन वर्षाचं स्वागतही केलं होतं.