'अंजली'साठी सुरुचीने केले ८४ तास काम

'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली आदिती अर्थात सुरुची अडारकर आता 'अंजली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येतेय.

Updated: May 21, 2017, 06:21 PM IST
'अंजली'साठी सुरुचीने केले ८४ तास काम title=

मुंबई : 'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली आदिती अर्थात सुरुची अडारकर आता 'अंजली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येतेय.

या मालिकेचे चित्रीकरण सुरु असून येत्या २२ मेला ही मालिका प्रसारित होतेय. मालिकेतील अंजली ज्याप्रमाणे आपल्या प्रोफेशनमध्ये व्यस्त असल्याचे दाखवण्यात आलेय त्याचप्रमाणे सुरुची या नव्या मालिकेसाठी चांगलीच मेहनत घेतेय.

साधारणपणे मालिकेचे शूटिंग १२ तास सुरु असते. मात्र  काही तांत्रिक गोष्टींमुळे  एपिसोडची  पूर्ण बँकिंग अजून तयार झालेल नाही  त्यामुळे सुरुची सेटवर जोमाने काम करतेय. इतकंच नव्हे तर गेल्या आठवड्यात तिने चक्क ८४ तास काम केलंय. त्यामुळे तिच्या या मेहनतीला मायबाप प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे २२ मेपासून समजेल