श्रद्धा, आलियापाठोपाठ सनीही बनतेय गायिका!

बॉलिवूडमध्ये पॉर्नस्टार अशीच ओळख बनलेली अभिनेत्री सनी लिओन आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Updated: Jul 9, 2016, 02:54 PM IST
श्रद्धा, आलियापाठोपाठ सनीही बनतेय गायिका! title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये पॉर्नस्टार अशीच ओळख बनलेली अभिनेत्री सनी लिओन आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

आजपर्यंत आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, श्रुती हसन यांसारख्या अभिनेत्रींनी काही हिंदी चित्रपटांतील गाणी गायली आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री सनी लिओनसुद्धा हैदराबादमध्ये प्रो कबड्डी लीगच्या समाप्ती सोहळ्यात राष्ट्रगीत गाताना दिसेल.

विशेष म्हणजे, यासाठी तिने कोणत्याही प्रकारचे मानधन घेतलेले नाही. सनीसोबत प्रो. कबड्डी लीगचे ब्रँड अम्बेसेडर अभिनेता राणा दग्गुबतीसुद्धा राष्ट्रगीत गाणार आहेत. याबद्दल सनी लिओनने टि्वट करून माहिती दिली.