मुंबई : शाहरूख खान २ नोव्हेंबर रोजी ५० वर्षांचा झाला. यावेळी त्याने आपल्या परिवारात वाढदिवस साजरा केला, एवढंच नाही तर त्याने आपल्या हजारो प्रेक्षकांचं मन्नतच्या बाहेर येऊन अभिवादन स्वीकारलं.
शाहरूख खान यावेळी मुलाखतीत वेब मीडियाशी मनसोक्त बोलला. शाहरूख म्हणत होता, मला अनेक वेळा सोशल नेटवर्किंगवर आई-बहिणीवरून शिव्या दिल्या जातात, अशा लोकांनी जर त्यांचा पत्ता मला दिला, तर मी घरी येऊन त्याना मारेन, कारण आई-बहिणीवरून मला शिव्या देणे किती योग्य आहे.
मला माझं देशप्रेम सिद्ध करायला लावतात, यापेक्षा मोठं दुर्देव कोणतं नाही, असं देखील शाहरूखने म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.