सोनम कपूरचा हिऱ्यांचा हार चोरी

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिचा एक हिऱ्यांचा हार चोरीला गेलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, या हिऱ्यांच्या हाराची किंमत ५ लाख असल्याचं सांगण्यात येतंय.

Updated: Feb 12, 2015, 08:13 AM IST
सोनम कपूरचा हिऱ्यांचा हार चोरी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिचा एक हिऱ्यांचा हार चोरीला गेलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, या हिऱ्यांच्या हाराची किंमत ५ लाख असल्याचं सांगण्यात येतंय.

सोनमच्या घरातूनच हा हार चोरीला गेलाय. याबद्दल सोनमनं जुहू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलीय. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केलीय. 

पोलिसांनी कलम ३८० अंतर्गत चोरीच्या प्रकरणाची नोंद केलीय आणि पुढील तपास सुरू केलाय. 

अनिल कपूर यांची मुलगी सोनम सध्या आपला आगामी सिनेमा 'प्रेम रतन धन पायो'च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. सोनमचा गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'डॉली की डोली' या सिनेमालाही समीक्षकांनी पसंती दिली होती. हा सिनेमा सलमानचा भाऊ अरबाज खान यानं दिग्दर्शित केला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.