'गोल्डन केला' अॅवॉर्ड्स मिळविण्यात सोनाक्षीची हॅटट्रिक!

सोनाक्षी सिन्हाला ७व्या गोल्डन केला अॅवॉर्ड्समध्ये शनिवारी सर्वात वाईट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. 'अॅक्शन जॅक्सन', 'लिंगा' आणि 'हॉलिडे' मध्ये सोनाक्षीचा अभिनय पाहता हा पुरस्कार दिला गेलाय. 

Updated: Mar 15, 2015, 09:50 AM IST
'गोल्डन केला' अॅवॉर्ड्स मिळविण्यात सोनाक्षीची हॅटट्रिक! title=

मुंबई: सोनाक्षी सिन्हाला ७व्या गोल्डन केला अॅवॉर्ड्समध्ये शनिवारी सर्वात वाईट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. 'अॅक्शन जॅक्सन', 'लिंगा' आणि 'हॉलिडे' मध्ये सोनाक्षीचा अभिनय पाहता हा पुरस्कार दिला गेलाय. 

'गोल्डन केला अॅवॉर्ड', 'गोल्डन रास्पबेरी अॅवॉर्ड'चा भारतीय व्हर्जन आहे आणि हा बॉलिवूडमधील सर्वात खराब प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांना गमतीशीर पद्धतीनं पुरस्कृत करतात.

२७ वर्षीय सोनाक्षीनं कतरिना कैफ, सोनम कपूर, तमन्ना भाटिया आणि जॅकलीन फर्नांडिसला मागे टाकत यावर्षी 'गोल्डन केला अॅवॉर्ड' जिंकला. मागील वर्षी आर. राजकुमारसाठी आणि २०१३मध्ये सर्व चित्रपटांमधील आपल्या प्रदर्शनाबद्दल हा पुरस्कार दिला गेलाय.

अर्जुन कपूरला 'गुंडे' आणि इतर सर्व अभिनयासाठी सर्वात खराब पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेलाय. सैफ अली खानचा 'हमशकल्स'ला सर्वात खराब चित्रपट आणि 'अॅक्शन जॅक्सन'साठी प्रभू देवाला सर्वात खराब दिग्दर्शक पुरस्कार दिला गेलाय.

टायगर श्रॉफला हिरोपंतीसाठी सर्वात खराब नवोदित अभिनेत्याचा आणि संगीतकार, गायक यो यो हनी सिंहला 'बस कीजिए बहुत हो गया' पुरस्कारासाठी निवडलं गेलं. 'यारियाँ' चित्रपटातील गाणं 'ब्लू है पानी पानी' सर्वात खराब गाणं ठरलं.

हृतिक रोशनचा चित्रपट 'बँग बँग'ला 'आरजीवी की आग' अॅवॉर्डसाठी निवडलं गेलं. म्हणजे सर्वाधिक खराब रिमेक...सिक्वेल. गोल्डन केला अॅवॉर्डचे संस्थापक जतिन वर्मा यांनी सांगितलं, 'या अॅवॉर्ड्समुळे आम्ही कोणाच्या भावना दुखावू इच्छित नाही. आम्हाला आशा आहे पुरस्कार विजेते चांगल्या भावनेनं हा पुरस्कार स्वीकारतील आणि प्रेक्षकांसाठी चांगलं काम करतील.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.