अर्जुन सांगतोय सोनाक्षी आणि आपल्या नात्याबद्दल!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं अफेअर सुरु असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात ऐकायला मिळतेय... पण, अखेर अर्जुन कपूरनं यामागचं खरं उघडपणे व्यक्त केलंय. 

Updated: Oct 16, 2014, 10:39 AM IST
अर्जुन सांगतोय सोनाक्षी आणि आपल्या नात्याबद्दल! title=

नवी दिल्ली : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं अफेअर सुरु असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात ऐकायला मिळतेय... पण, अखेर अर्जुन कपूरनं यामागचं खरं उघडपणे व्यक्त केलंय. 

‘मी सोनाक्षीला डेट करत नाहीय’ असं अर्जुननं एका मुलाखतीत म्हटलंय. सोबतच, ‘सोनाक्षी आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत... आम्ही दोघांनीही एकाच शाळेत शिक्षण घेतलंय... पण, आमच्या दोघांत रोमान्ससारखं काहीही नाही’ असं अर्जुननं यावेळी म्हटलंय.  


 

काही दिवसांपासून सोनाक्षी आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या बातम्या येत होत्या... या दोघांनी इस्तंबूलमध्ये एकत्र सुट्टी घालवलीय... तसंच या दोघांचं कुटुंबही या लग्नासाठी तयार असल्याचं सांगण्यात येत होतं... पण, आपल्या आणि सोनाक्षीच्या नात्याला 'मैत्री' सांगून अर्जुननं या चर्चेतली हवाच काढून टाकलीय. 

अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा लवकरच जानेवारीत प्रदर्शित होणाऱ्या 'तेवर' या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. अर्जुनचा काका  संजय कपूर हा 'तेवर'चा निर्माता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.