रणबीर-कतरिना ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये…

बॉलिवूड स्टार जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ काही दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं समजतंय. रणबीरची सर्जरी झाल्यानंतर कतरीना त्याची काळजी घेत असल्याचे कळते.

Updated: Oct 15, 2014, 06:49 PM IST
रणबीर-कतरिना ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये…  title=

मुंबई : बॉलिवूड स्टार जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ काही दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं समजतंय. रणबीरची सर्जरी झाल्यानंतर कतरीना त्याची काळजी घेत असल्याचे कळते.

 

या दोघांच्या नात्यानं अनेक चढ-उतार पाहिलेत. बऱ्याच चर्चेनंतर आणि आपलं ‘रिलेशनशीप स्टेटस’ सगळ्यांपासून लपवत असतानाच आता मात्र रणबीर आणि कतरिनानं एकाच घरात राहण्याचा निर्णय घेतलाय. पण, अजूनही या दोघांपैंकी एकानंही या गोष्टीची जाहीर कबुली दिलेली नाही.

 

'अजब-प्रेम की गजब कहानी' या सिनेमातून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आलेल्या या जोडीला प्रेक्षकांच्याही पसंती पावती मिळाली होती. त्यांचे प्रेमप्रकरणंही याच दरम्यान सुरु झालं होतं. या बद्दल कतरीनाला आणि रणबीरलाही अनेकदा प्रश्न विचारण्यात आले... पण, दोघांनीही गप्प राहणंच पसंत केलं.

 

नुकत्याच रिलीज झालेल्या 'बँग बँग' या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कतरीनाला तिच्या आणि रणबीरच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारण्यात आले तेव्हाही तिनं या प्रश्नांची उत्तरं देण्यास टाळाटाळ केली. 

 

तसंच, कतरिनाला एका मुलाखातीत रणबीरबद्दलही प्रश्न विचारण्यात आला... तेव्हा तिनं, ‘रणबीर हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे... तो एक चांगला माणूस आणि अभिनेता आहे’ असं उत्तर दिलं होतं.

 

‘मला माझं वैयक्तिक आयुष्य मीडियापासून लांबच ठेवायला आवडतं...’ असं कतरिनानं अनेकदा म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.