'दिल दोस्ती दुनियादारी'ला काही काळासाठी ब्रेक

झी मराठी वाहिनीवर अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका काही काळासाठी ब्रेक घेणार आहे. मात्र काही काळानंतर या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. 

Updated: Jan 29, 2016, 10:34 AM IST
'दिल दोस्ती दुनियादारी'ला काही काळासाठी ब्रेक title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवर अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका काही काळासाठी ब्रेक घेणार आहे. मात्र काही काळानंतर या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. 

डोंबिवलीतील एका कार्यक्रमादरम्यान या मालिकेतील कलाकारांनी ही माहिती दिली. मात्र या मालिकेच्या जागी कोणता कार्यक्रम असणार आहे हे गुलद्स्त्यात ठेवण्यात आलंय. 

तरुणाईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मालिकेतील आशु, सुजय, कैवल्य, मीनल, रेश्मा, अॅना या पात्रांनी तरुणाईचे मन अल्पावधीतच जिंकले होते. पहिल्या भागापासून प्रेक्षकांनी या मालिकेला पसंतीची पावती दिली होती.