'एअरलिफ्ट'मधल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत

अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. 1990च्या दशकात कुवेतमधून भारतीयांची कशी सुटका करण्यात आली, त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे.

Updated: Jan 28, 2016, 10:52 PM IST
'एअरलिफ्ट'मधल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत title=

नवी दिल्ली :  अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. 1990च्या दशकात कुवेतमधून भारतीयांची कशी सुटका करण्यात आली, त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हा चित्रपट मनोरंजनासाठी चांगला आहे,  पण या चित्रपटातल्या सगळ्याच गोष्टी सत्याला धरून नाहीत, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिली आहे.

अनेक चित्रपटांप्रमाणेच एअरलिफ्टनंही कलात्मक स्वातंत्र्य घेत खरी घटना आणि चित्रपटामध्ये बदल केले. 1990 च्या भारतीयांच्या सुटकेमध्ये हवाई वाहतूक विभाग, एअर इंडिया आणि इतर सरकारी खात्यांनी चांगल्या प्रकारे समन्वय केला. तसंच परराष्ट्र मंत्रालयानंही योग्य पावलं उचलली आणि एक टीम बगदाद तसंच कुवेतला पाठवली  या ऑपरेशनमध्ये भारतीयांची सुटका करण्यासाठी बनवण्यात आलेल्या टीमचा मी पण हिस्सा होतो, असं स्वरुप म्हणालेत.  अक्षय कुमारच्या या चित्रपटामध्ये परराष्ट्र मंत्रालयानं जलद पावलं उचलली नाहीत, असं दाखवण्यात आलं आहे. त्यावर स्वरुप यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
तसंच हा चित्रपट बघितल्यामुळे अनेक जण त्यावेळी नेमकं काय झालं होतं, परराष्ट्र मंत्रालयानं भारतीयांचे जीव कसे वाचवले होते, याबाबत वाचन करतील, अशी आशाही स्वरुप यांनी व्यक्त केली आहे.