गायक अभिजीत भट्टाचार्य विरोधात छेडछाडीची तक्रार

गायक अभिजीत भट्टाचार्य मोठ्या अडचणीत त्याच्या कृत्यामुळे आलाय. अभिजीत विरोधात एका महिलेने छेडछाड केल्याची तक्रार दाखल केलेय.

Updated: Oct 23, 2015, 05:45 PM IST
गायक अभिजीत भट्टाचार्य विरोधात छेडछाडीची तक्रार title=

मुंबई : गायक अभिजीत भट्टाचार्य मोठ्या अडचणीत त्याच्या कृत्यामुळे आलाय. अभिजीत विरोधात एका महिलेने छेडछाड केल्याची तक्रार दाखल केलेय.

वर्सोवामधील लोखंडवाला दुर्गा मंडपात आलेल्या एका महिलेने ओशिवारा पोलिसात तक्रार दाखल केली. ३४ वर्षीय महिला ही गायक कैलाश खेर यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी येथील मंडळात आली होती. गर्दी असल्याने ही महिला उभी राहून कार्यक्रम पाहत होती. तिच्या शेजारी उभ्या असणाऱ्या अभिजीतने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असा तिचा आरोप आहे. 

आपण अभिजीतला विरोध केला, तेव्हा त्याने जाहीरपणे  शिवीगाळ केली. इतर महिला कार्यकर्त्यांनी अभिजीतला तिथून बाहेर जाण्यास सांगितले, असे या महिलेने म्हटलेय. 

दरम्यान, तुला याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी अभिजीतने दिली. असे दिलेल्या तक्रारीत तिने म्हटलेय. पोलिसांनी ३५४ अ आणि ३४ नुसार गुन्हा केलाय. वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असणारा गायक अभिजीत पुन्हा एकदा वादात अडकलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.