ऋतिक कंगनाच्या ब्रेकअपमधला धमाकेदार ट्विस्ट!

गेल्या काही दिवसांपासून ऋतिक रोशन आणि कंगना रानौतच्या ब्रेक अपच्या बातम्यांनी त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पण, या ब्रेकअपमध्ये एक जोरदार ट्विस्ट आलाय. 

Updated: Mar 23, 2016, 11:16 AM IST
ऋतिक कंगनाच्या ब्रेकअपमधला धमाकेदार ट्विस्ट! title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऋतिक रोशन आणि कंगना रानौतच्या ब्रेक अपच्या बातम्यांनी त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पण, या ब्रेकअपमध्ये एक जोरदार ट्विस्ट आलाय. 

हा ट्विस्ट आहे बीग बी अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा... या ब्रेकअपचं कारणीभूत श्वेता असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलंय. 

कंगनाशी संबंध असल्यामुळेच ऋतिकचा सुझान खानशी घटस्फोट झाला होता... त्यानंतर आता ऋतिक श्वेता नंदा हिला डेट करत असल्यानंच कंगनानं ऋतिकला 'एक्स बॉयफ्रेंड' करून टाकलं, असं म्हटलं जातंय. 

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनावतनं काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनचा उल्लेख सिली एक्स असा केला होता. ज्याला हृतिक रोशनं जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. 'मीडियानं जेवढ्या महिलांसोबत माझं नाव जोडलंय... त्यापेक्षा पोप  सोबत डेटवर जाण्याचे माझे जास्त चान्सेस आहेत' असं ट्विट हृतिकनं केलं.