...ही हॉट अभिनेत्री बनणार अजय देवगणची हिरोईन!

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मल्याळम सिनेमा 'दृश्यम'च्या हिंदू रिमेकमध्ये दिसणार आहे. हा एक थ्रिलर सिनेमा असल्याचं म्हटलं जातंय.

Updated: Mar 12, 2015, 02:11 PM IST
...ही हॉट अभिनेत्री बनणार अजय देवगणची हिरोईन! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मल्याळम सिनेमा 'दृश्यम'च्या हिंदू रिमेकमध्ये दिसणार आहे. हा एक थ्रिलर सिनेमा असल्याचं म्हटलं जातंय.

मूळ सिनेमात मोहनलाल यांनी निभावलेल्या भूमिकेत अजय देवगण ताजेपणा आणण्याचा प्रयत्न करणार आहे. या सिनेमात अजय एका अशा व्यक्तीची भूमिका निभावतोय ज्याच्या पत्नीनं आणि छोट्या मुलीनं स्वत:च्या सुरक्षेसाठी एक गुन्हा केलाय... त्यामुळेच, पत्नी आणि मुलीला वाचवण्यासाठी पती एक अनोखा प्लान बनवतो आणि अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. 

या सिनेमात अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत श्रेया सरनची निवड करण्यात आलीय. दक्षिणेकडची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी श्रेया या सिनेमातही तडका लावणार असं दिसतंय. अभिनेत्री तब्बू एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

श्रेयानं या अगोदर काही हिंदी सिनेमांमध्येही काम केलंय. पण, यश काही तिच्या हाती लागलं नाही. 

या सिनेमाचं शूटींग गोवा, हैदराबाद आणि केरळमध्ये होणार आहे. निशिकांत कामत दिग्दर्शित हा सिनेमा ऑक्टोबर २०१५ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.