शत्रुघ्न सिन्हांनी घेतला अनुराग कश्यपचा समाचार

भाजपचे वरिष्ठ नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अनुराग कश्यपच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. भाजपचे खासदार सिन्हा यांनी म्हटलं की, पीएम मोदीच्या पाकिस्तानच्या दौऱ्याचा आणि करण जोहरच्या सिनेमाचा काय संबंध आहे हे समजत नाही. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तान दौऱा हा ऐतिहासिक होता ज्याची अनके देशांची प्रशंसा केली.

Updated: Oct 18, 2016, 11:25 PM IST
शत्रुघ्न सिन्हांनी घेतला अनुराग कश्यपचा समाचार title=

मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अनुराग कश्यपच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. भाजपचे खासदार सिन्हा यांनी म्हटलं की, पीएम मोदीच्या पाकिस्तानच्या दौऱ्याचा आणि करण जोहरच्या सिनेमाचा काय संबंध आहे हे समजत नाही. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तान दौऱा हा ऐतिहासिक होता ज्याची अनके देशांची प्रशंसा केली.

सिन्हा यांनी म्हटलं की,'अनुरागचं ट्विट मी समजू नाही शकलो. आपण आपल्या पंतप्रधानांच्या ऐतिहासिक दौऱ्याची गरीमा कमी नाही केली पाहिजे. पीएम मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याची जगभरातून प्रशंसा झाली. मी पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा आणि करण जोहरच्या सिनेमामधला संबंध काय हे समजू नाही शकलो. आणि करण जोहर आणि अनुराग कश्यप यांच्यातील संबंध देखील नाही समजू शकलो.

राजकीय समीकरण इतक्या झपाट्याने बदलतात की आज मित्र असलेला शेजारील देश उद्या तुमचा शत्रू असू शकतो. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान भेटीवर टीका करणाऱ्या बॉलिवूड निर्माता अनुराग कश्यपवर चारही बाजूंनी टीका होण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधले अनेक जण अनुराग कश्यप यांच्याविरोधात टीका करु लागले आहेत.