मुंबई : बॉलिवूड निर्माता करण जोहरने 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमावरुन सुरु असलेल्या वादावर अखेर मौन सोडलं आहे. करण जोहरने म्हटलं आहे की, 'माझ्यासाठी देश सर्वात आधी आहे. यापुढे पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम नाही करणार'.
करण जोहरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, 'जेव्हा सिनेमाची शुटींग सुरु झाली होती तेव्हा स्थिती वेगळी होती. मागील दोन आठवड्यांपासून चर्चा सुरु होती की मी गप्प का आहे. मी गप्प यामुळे होतो कारण मला वाटत होतं की लोकं मला देशद्रोही समजत होते आणि यामुळे मी दु:खी होतो.'
यासोबतच करण जोहरने म्हटलं की, 'मी देशाच्या भावनेचा सन्मान करतो. पण यासिनेमासोबत ३०० लोकाचं जीवन जोडलेलं आहे. आपल्या देशाने शेजारील देशासोबत संबंध चांगले करण्यासाठी अनेक प्रयत्न केले.' करणने म्हटलं की, जेव्हा सिनेमा बनत होता तेव्हा वातावरण ठीक होतं.
.पाहा व्हिडिओ