मुंबई : तेलगू सिनेमा बाहुबली २चं हिंदी डबिंग एका मराठी अभिनेत्याच्या आवाजात करण्यात आलं आहे. २०१७ चा बहुप्रतीक्षित सिनेमा 'बाहुबली : द कन्क्लूजन' शुक्रवारी रिलीज होणार आहे. बाहुबली १ मध्ये भूमिका करणारा प्रभास एका रात्रीत देशभरात प्रसिद्ध झाला होता. टीव्हीच्या दुनियेतील अभिनेता शरद केळकर हे त्यांच्या दमदार आवाजासाठी ओळखले जातात. पण त्यांच्या जीवनातही यूटर्न तेव्हा आला जेव्हा राजामौली यांच्या 'बाहुबली' सिनेमासाठी त्यांनी आवाजाची टेस्ट दिली.
केळकर यांनी म्हटलं की, 'मी टीव्हीवर अनेक वर्षापासून काम करत आहे. खूप जण म्हणायती की, तुमचा आवाज खूप छान आहे. डबिंग का नाही करत. जे अनेक हॉलिवूड सिनेमांचं डबिंग करतात त्याचच नाव 'डबिंग' आहे. मी तेथूनच डबिंग शिकलो. मी प्रोफेशनली डबिंग नव्हतो करत पण सुरुवात झाली.
'या सिनेमात मी आवाज दिला आहे हे सांगितल्यावर लोकांना विश्वास नाही बसत. मी करण जौहर यांना अनेक दिवसांपासून ओळखतो. त्यांना ही जेव्हा माहित पडलं की मी या सिनेमात आवाज दिला आहे तर त्यांना देखील विश्वास बसला नाही. डबिंग करतांना भाषेच्या अडचणी येतात. मी डबिंग कलाकार नाही आहे. मी एक अभिनेता आहे. पण संपूर्ण सिनेमा सिनेमा पाहिल्यानंतरच मी डबिंग करतो.'
शरद यांनी फक्त ५ दिवसात या सिनेमाच डबिंग केलं आहे. पहिला सिरीजसाठी जास्त वेळ लागला होता पण दुसरी सिरीज पाच दिवसात पूर्ण केली.