पाहा - लावणीतील संमती आणि हो-नाही

Updated: Mar 15, 2016, 09:11 PM IST

मुंबई : ही लावणी एका वेगळ्या विषयावर आपल्याला घेऊन जाते, सेक्स सारख्या नाजूक आणि गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या विषयावर ही लावणी वाटते. हो किंवा नाही म्हणणं किंवा पाहुया - बघुया यासारखी उत्तरं म्हणजे 'संमतीच्या पॉईंट' या विषयावर ही लावणी आहे. ही लावणी अश्लील असल्याची टीका या लावणीवर होऊ शकते.

संमती देण्याच्या मिळवण्याच्या मोहक शृंगारिक प्रवासातील बारकावे मेघा आणि शक्कू एकमेकांना बारकावे सांगतात.

या व्हि़डीओतील कलाकार शकुंतला नगरकर म्हणजेच शक्कू आणि मेघा घाडगे म्हणजेच मेघा, तर चिकना भारीची भूमिका गौरव गेराने पार पाडली आहे. परोमिता व्होरा यांनी ही लावणीची निर्मिती केली आहे.

हा व्हिडीओ प्रेम, सेक्स आणि इच्छा या एंजट ऑफ इश्क या यू-ट्यूब चॅनेलचा भाग आहे.