थुकरटवाडीत आता किंग खान शाहरुख!!!

मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर कोण आलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. 

Updated: Apr 6, 2016, 10:49 PM IST
थुकरटवाडीत आता किंग खान शाहरुख!!! title=

मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर कोण आलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. चक्क किंग खान शाहरुख चला हवा येऊ द्या च्या थुकरटवाडीत आला होता. बुधवारी मुंबईत गुढीपाडवा स्पेशल भागाचं चित्रिकरण पार पडलं. 

यशाची शिखरं सर करणाऱ्या 'चला हवा येऊ द्या'ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. काहीच दिवसांपूर्वी नीरजाच्या प्रमोशनसाठी सोनम कपूरही थुकरवाडीत आली होती. त्यानंतर रॉकी हँडसमच्या प्रमोशनसाठी जॉन अब्राहम थुकरटवाडीत आला होता. आता मात्र बॉलिवूडचा किंग शाहरुख खान 'फॅन'चं प्रमोशन करण्यासाठी आला होता. 

चला हवा येऊ द्याच्या चाहत्यांसाठी हा नक्कीच आवडता क्षण असणार. तसंच या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमसाठी हा अभिमानाचा क्षण असणार यात शंका नाही.