'शाहरूख राहतो भारतात, पण मन पाकिस्तानात'- कैलास विजयवर्गीय

असहिष्णुतेवरून देशभरात सुरू असलेल्या वादामध्ये आता भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांची भर पडलीय. 'अभिनेता शाहरूख खान राहतो तर भारतात पण त्याचं मन पाकिस्तानात असल्याचं' विजयवर्गीय म्हणालेत. 

Updated: Nov 4, 2015, 01:51 PM IST
'शाहरूख राहतो भारतात, पण मन पाकिस्तानात'- कैलास विजयवर्गीय title=

मुंबई: असहिष्णुतेवरून देशभरात सुरू असलेल्या वादामध्ये आता भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांची भर पडलीय. 'अभिनेता शाहरूख खान राहतो तर भारतात पण त्याचं मन पाकिस्तानात असल्याचं' विजयवर्गीय म्हणालेत. 

अधिक वाचा - हाफिज सईदच्या शाहरूखला पायघड्या, पाकिस्तानात राहण्याचं निमंत्रण

ट्विटरवरून कैलास विजयवर्गीय म्हणाले, शाहरूखचे चित्रपट इथं कोट्यवधी रुपये कमावतात पण त्याला भारत असहिष्णु दिसतो. हा देशद्रोह नाहीय का?

त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटाबद्दल म्हटलं, 'जेव्हा १९९३मध्ये मुंबईत असंख्य लोकं मारले गेले तेव्हा शाहरूख कुठे होता? जेव्हा मुंबईवर २६/११चा हल्ला झाला तेव्हा कुठे होता शाहरूख?'. आज संपूर्ण जगानं भारत आणि त्याचं नेतृत्व मान्य केलंय. अशात इथं असहिष्णुता वाढली, असं म्हणणं जगासमोर भारताची प्रतिमा खराब करण्यासारखं असल्याचं विजयवर्गीय शाहरूखला म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कैलाश विजयवर्गीय यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. 

अधिक वाचा - शाहरूखचा 'फॅन' सिनेमाचा व्हिडीओ यू-ट्यूबवर 'व्हायरल'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.