सानिया मिर्जाच्या बहिणीच्या संगीत सोहळ्यात सलमान, परिणितीचा डान्स

टेनिस खेळाडू सानिया मिर्जाची बहिण अनम मिर्जा ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सानिया मिर्जा सध्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.   

Updated: Nov 17, 2016, 08:35 PM IST
सानिया मिर्जाच्या बहिणीच्या संगीत सोहळ्यात सलमान, परिणितीचा डान्स title=

मुंबई : टेनिस खेळाडू सानिया मिर्जाची बहिण अनम मिर्जा ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सानिया मिर्जा सध्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.   

सानियाने तिच्या बहिणीच्या संगीत कार्यक्रमात खूप डान्स केला. पण डान्स करणारी ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत होते बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोपडा आणि बॉलिवूडचा दबंग खान सलमान. परिणितीने डान्स करतांनाचा एक फोटो तिच्या ट्विटरवर शेअर केला आहे. 'जानेमन आह! सो मच फन.' असं सोबत तिने ट्विट केलं आहे.