मुंबई : अभिनेता सलमान खानने केलेल्या वादग्रस्त ट्विटवर अखेर तोंड उघडलं. सलमानच्या बलात्काराच्या वक्तव्यानंतर सर्वांनीच त्याच्यावर जोरदार टीका केली होती. तर वडील सलीम यांनी त्याने भावनेच्या भरात म्हटले होते, त्याचा महिलांना दुखविण्याचा उद्देश नसल्याचे सांगून पाठराखण केली होती
.
'एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आप की भी नही सुनता' असा सिनेमात डायलॉग म्हणणारा सलमान या वादानंतर आता मला कमी बोलायला हवे असे म्हणत आहे. सध्या मी जे काही बोलत आहे त्याचा उलट अर्थ काढला जात आहे. त्यामुळे मला कमी बोलायला हवे, असे सलमामने म्हटले आहे.
आयफा अवॉर्डसाठी मुलाखत देताना सलमान खानने ही प्रतिक्रिया दिली. यावेळी म्हणाला, मी जास्त वेळ नाही बोलणार. सध्या मी जेवढं कमी बोलेन तेच माझ्यासाठी चांगले असेल, असं सलमान खान बोलला आहे. दरम्यान, सलमान खानने आपल्या बलात्काराच्या वक्तव्याचा उल्लेख केला नाही तसेच यावर माफीही मागितली नाही.
बलात्काराच्या वक्तव्यावर सलमाननं जाहीर माफी मागावी अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडून करण्यात आली आहे. तो ट्विट करताना म्हटले होते, माझी परिस्थिती बलात्कार पिडीत महिलेसारखी झालेय. त्यानंतर सोशल मिडियावर संताप झाला होता.