'बजरंगी भाईजान'चे वादळ, ६०० कोटी कमावले, आमीरचे रेकॉर्ड तोडणार का?

 सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडत ६०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. 

Updated: Aug 18, 2015, 08:03 PM IST
'बजरंगी भाईजान'चे वादळ, ६०० कोटी कमावले, आमीरचे रेकॉर्ड तोडणार का?  title=

मुंबई :  सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडत ६०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. 

जगभरात 'बजरंगी' ६०० कोटींच्या वर कमाई केली असल्याचे एका मनोरंजन वेबसाईटने सांगितले आहे. 

१७ ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटाने भारतात ३१६.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या काही दिवसात यात वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

यापूर्वी सलमानने पहिल्याच दिवशी २५ कोटीं कमविण्याचे 'किक' चित्रपटाचे रेकॉर्ड २६ कोटी रुपये कमवून मोडले आहे. 

आता ६०० कोटींपेक्षा अधिक कमाई केल्यानंतर सलमानचा हा चित्रपट आमिर खानाच्या 'पीके'चा ७३५ कोटींचा रेकॉर्ड तोडतो का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.