सलमानने गर्भवती महिलेला विचारले, हे कसे झाले?

बिग बॉस ९ मध्ये रविवारी शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या मजामस्ती प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ठरली. या दोघांनी शोमध्ये वादग्रस्त अॅक्ट केले. 

Updated: Dec 21, 2015, 04:34 PM IST
 सलमानने गर्भवती महिलेला विचारले, हे कसे झाले? title=

नवी दिल्ली : बिग बॉस ९ मध्ये रविवारी शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या मजामस्ती प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ठरली. या दोघांनी शोमध्ये वादग्रस्त अॅक्ट केले. 

यावेळी बॉलीवूडचा दबंग खान सलमानने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या गर्भवती महिलेला मजामस्तीमध्ये हे कसे झाले? असे विचारले. त्या महिलनेही हसत हसत जसे व्हायचे होते तसेच झाले असे उत्तर दिले. 

यावेळी शोदरम्यान त्यांनी एक एक केळे हातात घेतले आणि आपआपसांत बदलले. त्यानंतर विनोद करता करता त्या दोघांनी केळे खाऊन टाकले. तसेच या दोघांनी एकमेकांच्या प्रसिद्ध गाण्यांवर डान्सही केले. सलमानने शाहरुखच्या लुंगी डान्सवर नाच केला तर शाहरुखने दबंग गाण्यावर डान्स केला. तसेच या दोघांनी ये बंधन तो प्यार का बंधन है हे गाणेही गायले.