सलमानने मागितली कॅटरिनाची माफी

काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील रिलेशनची खूपच चर्चा होती. पण आता या दोघांमध्ये फक्त मैत्रीचे संबंध आहेत. पण काही दिवसांपूर्वी सलमान खानने कॅटरिना बद्दल केलेलं वक्तव्य त्याला चांगलंच भारी पडलं. त्यासाठी सलमानला कॅटरिनाची माफीही मागावी लागली.

Updated: Dec 6, 2015, 04:42 PM IST
सलमानने मागितली कॅटरिनाची माफी title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील रिलेशनची खूपच चर्चा होती. पण आता या दोघांमध्ये फक्त मैत्रीचे संबंध आहेत. पण काही दिवसांपूर्वी सलमान खानने कॅटरिना बद्दल केलेलं वक्तव्य त्याला चांगलंच भारी पडलं. त्यासाठी सलमानला कॅटरिनाची माफीही मागावी लागली.

सलमानने अनेक वेळा कॅटरिना बद्दल वक्तव्य केली. पण कपिल शर्माच्या शोमध्ये सलमानने कॅटरिनाबाबत 'ती तर माझ्याही काही कामाची नव्हती' हे वक्तव्य कॅटरिनाने खपवून घेतलं नाही. तिने सलमानला फोन केला आणि याबाबत स्पष्टीकरण मागितलं.

कॅटरिनाने सलमानला म्हटलं की, 'आपल्यामध्ये काही असेच संबंध आहेत का ?' त्यावर सलमानने सॉरी म्हणत यासाठी मी मीडियामध्येही माफी मागायला तयार असल्याचं म्हटलं. त्यानंतर पुन्हा अशी वक्तव्य करू नका असं मी सलमानला म्हटलं.'

कॅटरिना कैफने एका मॅगेझिनला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.