सलमानच्या गळ्यातील 'गदा' आता तुमची होऊ शकते!

'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये सर्वात अगोदर लक्षात येते ती सल्लूमियाँच्या गळ्यातील 'गदे'च्या आकाराचं लॉकेट... 

Updated: Jun 2, 2015, 12:09 PM IST


हेच ते लॉकेट

नवी दिल्ली :  'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये सर्वात अगोदर लक्षात येते ती सल्लूमियाँच्या गळ्यातील 'गदे'च्या आकाराचं लॉकेट... अर्थात ते तुम्ही आत्तापर्यंत नक्कीच पाहिलं असेल... हेच लॉकेट आता तुम्हीही मिळवू शकता... 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दबंग खान सलमान खानच्या आगामी सिनेमा 'बजरंगी भाईजान'च्या ट्रेलरनं यूट्यूबवर लोकप्रियतेचा रेकॉर्ड कायम केलाय.

या सिनेमाचा फर्स्ट लूक शाहरुख खान आणि आमिर खाननं सलमानचा एक फोटो पोस्ट करून जाहीर केला होता. या फोटोत सलमानच्या गळ्यात एका गदेच्या आकाराचं लॉकेट दिसतंय. टीझरमध्ये सलमानच्या गळ्यात दिसणारं हेच पेंडंट आता ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

ऑनलाईन ज्वेलरी विक्री करणारी वेबसाईट www.kuberbox.com वर सलमान खानचं बजरंगी भाईजानमध्ये दिसणारं पेंडंट केवळ 71,154 रुपयांना उपलब्ध आहे. 

सोन्याची गदा... 
18 कॅरेटचं सोनं आणि 0.85 कॅरेटच्या 17 खऱ्या हिऱ्यांचं हे पेंडंट बनवलेलं आहे. या सोन्याच्या गदेचं एकूण वजन आहे 9 ग्रॅम... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.