सलमानच बिग बॉस-8चा होस्ट, प्रत्येक आठवड्याला मिळणार 6 कोटी

अभिनेता सलमान खान आणि बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. मिळालेल्या वृत्तानुसार बिग बॉस-8 सीजनचा होस्ट हा समलान खान असणार आहे. त्याला प्रत्येक आठवड्याला 6 कोटी रुपये मिळणार आहे.

Updated: Jul 24, 2014, 03:59 PM IST
सलमानच बिग बॉस-8चा होस्ट,  प्रत्येक आठवड्याला मिळणार 6 कोटी title=

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. मिळालेल्या वृत्तानुसार बिग बॉस-8 सीजनचा होस्ट हा समलान खान असणार आहे. त्याला प्रत्येक आठवड्याला 6 कोटी रुपये मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी सलमानने बिग बॉसच्या आठव्या सीजनमध्ये काम करणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, सलमानला मोठी रक्कम देण्याचा नक्की करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सलमान हा बिग बॉसच्या 8व्या भागात दिसणार आहे. दरम्यान, 7 व्या सीजनमध्ये सलमानने तीन कोटी रुपये घेतले होते. मात्र, यावर्षी त्यांने आपल्या रक्कम दुप्पट केली आहे.

बिग बॉस सीजन 8 हा गेल्या सीजनपेक्षा भव्यदिव्य असणार आहे, असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते. बिग बॉसच्या सीजन-8 साठी आधी शाहरुख खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, रितिक रोशन यांच्या नावांचा विचार करण्यात आला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.