नवी दिल्ली : गेल्या १५ वर्षांपासून पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीय मुलीला - गीताला तिच्या घरी पोहचवण्यासाठी आता खुद्द बॉलिवूडचा 'बजरंगी भाईजान' सलमान खान पुढे सरसावलाय.
गीताला भारतातील तिच्या घर आणि कुटुंबीय शोधून देण्यासाठी जोरदार प्रयत्न होताना दिसतायत. सोमवारी परदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी इस्लामाबाद स्थित भारतीय उच्चायुक्त टीसीए राघवन यांना कराचीला जाऊन मुलीची भेट घेण्याचे निर्देश दिले होते. आता याच प्रकरणी सलमान खाननंही गीताची मदत करायचं ठरवलंय.
पाकिस्तानचे माजी मंत्री आणि मानवाधिकार कार्यकर्ता अन्सार बर्नी यांनी सोमवारी रात्री ट्विटरवरून ही माहिती दिलीय. गीताला आपण कोणत्या पद्धतीनं मदत करू शकतो, याबद्दल विचारपूस करण्याची जबाबदारी सलमाननं 'बजरंगी भाईजान'चा दिग्दर्शक कबीर खान यांच्याकडे सोपवलीय.
Salman Khan offers to help Geeta. Asks director Kabir Khan to find out how he can help Geeta meet her family @SushmaSwaraj @MehrTarar
— Ansar Burney (@AnsarBurney) August 4, 2015
मूळ भारतीय गीता सध्या कराचीत सामाजिक कार्यकर्ते बिलकीस ईधी य़ांच्या घरी राहतेय. सध्या गीता २२ वर्षांची आहे. ९ वर्षांची असताना ती ट्रेनमधून पाकिस्तानात पोहचली होती. गीता बोलू किंवा ऐकू शकत नाही. गीतासाठी बिलकीस यांनी आपल्या घरातच एक मंदिरही बनवलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.