सलमानने 'सुल्तान'मध्ये दिला बॉडीगार्डच्या मुलाला रोल

नव्या ट्रलेंटला संधी देण्यासाठी प्रसिद्ध असलेला बॉलीवूडचा दबंग खानने पुन्हा एका व्यक्तीला संधी दिली आहे. हा व्यक्ती कोणी दुसरा नाही तर त्याचाच बॉडीगार्ड शेरा याचा मुलगा आहे.

Updated: Jan 3, 2016, 09:44 PM IST
सलमानने 'सुल्तान'मध्ये दिला बॉडीगार्डच्या मुलाला रोल title=

मुंबई : नव्या ट्रलेंटला संधी देण्यासाठी प्रसिद्ध असलेला बॉलीवूडचा दबंग खानने पुन्हा एका व्यक्तीला संधी दिली आहे. हा व्यक्ती कोणी दुसरा नाही तर त्याचाच बॉडीगार्ड शेरा याचा मुलगा आहे.

१७ वर्षापासून सलमानचा बॉडीगार्ड असलेल्या शेरा हा सलमानला त्याच्या कुटुंबातील व्यक्तीसारखाच आहे. सलमानच्या आगामी सुल्तान या चित्रपटात टाईगरला एक महत्त्वाची भूमिका देणार आहे. या आधीही सलमानने सोनाक्षी सिन्हा, जरीन खान, स्नेहा उल्लाल, डेजी शाह, सूरज पंचोली आणि अथिया शेट्टी या सारख्या अनेक कलारारांना या आधी सलमानने संधी दिली आहे.

यशराज बॅनरच्या सुल्तानमध्ये सलमान एका पहेलवानच्या भूमिकेत आहे आणि रणदीप हुड्डा त्याच्या कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे.