मुंबई : हीट अँड रन प्रकरणी सलमान खानच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रकरणातला प्रमुख साक्षीदार रवींद्र पाटील यांचा जबाब साक्ष म्हणून ग्राह्य घरला जाईल असं न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सलमानच्या विरोधात ही साक्ष आहे त्यामुळे सलमान अडकण्याची चिन्हं आहेत. रवींद्र पाटील हा तेव्हा सलमान खानचा सुरक्षारक्षक होता. २००७ मध्ये पाटील यांचं निधन झाले. अपघातावेळी सलमान खानने मद्यपान केलं होतं अशी साक्ष रवींद्र पाटील यांनी दिली होती.
सलमानला गाडी हळू चालव असंही सांगितल्याचं पाटील यांनी साक्षीत म्हटलं होतं. सलमान दारू प्यायला होता हा फॉरेन्सिक चाचणीचा अहवाल आणि रवींद्र पाटील यांची साक्ष यामुळे सलमान या प्रकरणात पुरता अडकलाय, असं यावरून स्पष्ट होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.