आमिर शोधतोय तीन मुली...

 कुस्तीवर आधारित 'दंगल' या चित्रपटातून आमिऱ खान प्रेक्षकांना आपला 'नवा डाव' दाखविणार आहे. हा पठ्ठ्या या चित्रपटात तीन मुलींच्या वडिलांची भूमिका करणार आहे. पण अजून त्याला या तीन मुली सापडल्या नाहीत. त्या मुलींचा तो शोध करीत असल्याची माहिती समोर आली आहे. 

Updated: Mar 12, 2015, 04:33 PM IST
आमिर शोधतोय तीन मुली... title=

मुंबई :  कुस्तीवर आधारित 'दंगल' या चित्रपटातून आमिऱ खान प्रेक्षकांना आपला 'नवा डाव' दाखविणार आहे. हा पठ्ठ्या या चित्रपटात तीन मुलींच्या वडिलांची भूमिका करणार आहे. पण अजून त्याला या तीन मुली सापडल्या नाहीत. त्या मुलींचा तो शोध करीत असल्याची माहिती समोर आली आहे. 

आमिर खानचा चित्रपट बोललं की काही तरी वेगळं असणारच... त्यामुळे आमिरच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. आता प्रेक्षकांसाठी आमिर  "दंगल" नावाचा नवा चित्रपट घेऊन येतोय. 
 
या चित्रपटात आमिर एका कुस्तीपटूची भूमिका साकारत आहे. चित्रपटात तीन मुलींच्या वडिलांच्याही भूमिकेत तो दिसणार आहे. आमिर भारताच्या कुस्तीपटू गीता, बबिता आणि संगिता यांचे वडिल आणि कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिकेत दिसणार आहे. मात्र आमिरच्या मुलींच्या भूमिका कोण साकारणार हे अजून स्पष्ट झालेले नसून शोध सुरू आहे. 

डीएनए या इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार तापसी पन्नू, अक्षरा हसन आणि दीक्षा सेठ या तिघींची नावे पुढे आली आहेत. य़ापूर्वी अक्षरा हसनने "शमिताभ" आणि तापसी पन्नूने  "बेबी", "चश्मेबद्दूर'' या चित्रपटांत काम केलं आहे. नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.