६ मे रोजी लागणार सलमानचा निकाल...

अभिनेता सलमान खान हिट अॅन्ड रन प्रकरणाचा निकाल ६ मे रोजी लागणार आहे. यामुळे, १३ वर्षांपासून सुरु असलेलं हे प्रकरण अखेर निकालात निघणार आहे. 

Updated: Apr 21, 2015, 06:41 PM IST
६ मे रोजी लागणार सलमानचा निकाल... title=

मुंबई : अभिनेता सलमान खान हिट अॅन्ड रन प्रकरणाचा निकाल ६ मे रोजी लागणार आहे. यामुळे, १३ वर्षांपासून सुरु असलेलं हे प्रकरण अखेर निकालात निघणार आहे. 

१३ वर्षांपूर्वी २८ सप्टेंबर २००२ रोजी झालेल्या एका दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर ४ जण जखमी झाले होते. वांद्र्यात एका बेकरीच्या बाहेर झोपलेल्या लोकांच्या अंगावर सलमानची कार चढली होती. 

ही गाडी सलमान खान स्वत: चालवत होता आणि या दुर्घटनेवेळी तो नशेत होता, असेही आरोप करण्यात आले होते.  आरोप सिद्ध झाले तर सलमानला दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. 

या प्रकरणात सोमवारी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद सोमवारी संपला. बचाव पक्षानं टायर फुटून हा अपघात झाल्याचं म्हटलंय.... तसंच सलमान खानच्या ड्रायव्हरनंही दुर्घटनेवेळी सलमान नाही तर आपण स्वत: गाडी चालवत असल्याचं सांगत या दुर्घटनेची जबाबदारी घेतलीय... 

तर दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य साक्षीदार पोलीस शिपाई रवींद्र पाटील यानं दिलेल्या माहितीवरही चर्चा करण्यात आली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.