'हॅपी न्यू इअर'नं केला 300 चा आकडा पार!

शाहरुख खानचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘हॅप्पी न्यू इअर’नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ उडवून दिलाय. या सिनेमानं आत्तापर्यंत कमाईत 300 करोड रुपयांचा आकडा पार केलाय. 

Updated: Nov 5, 2014, 06:18 PM IST
'हॅपी न्यू इअर'नं केला 300 चा आकडा पार! title=

नवी दिल्ली : शाहरुख खानचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘हॅप्पी न्यू इअर’नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ उडवून दिलाय. या सिनेमानं आत्तापर्यंत कमाईत 300 करोड रुपयांचा आकडा पार केलाय. 

शाहरुखच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी निगडीत एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमानं जगभरात एव्हाना 310 करोड रुपयांहून अधिक कमाई केलीय. 

सिनेमाच्या या यशाला महानायक अमिताभ बच्चन यांनीही शुभेच्छा दिल्यात. ‘हॅपी न्यू इअरनं जगभरात 300 करोडोंचा आकडा पार केलाय. शाहरुख आणि फराहला शुभेच्छा... तर फराह, आपण दोघं एकत्र कधी काम करणार आहोत? हाहाहा…’ असं बीग बीनं सोशल वेबसाईट ट्विटरवर म्हटलंय. 

फराह खान दिग्दर्शित हा मल्टी स्टारर सिनेमा 24 ऑक्टोबरला प्रदर्शित झालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.