VIDEO : १५ वर्षांच्या सलमानची पहिली-वहिली जाहिरात!

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची पहिली जाहिरात कोणती असं विचारलं तर यापुढे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आठवले... 

Updated: Jun 21, 2016, 05:35 PM IST
VIDEO : १५ वर्षांच्या सलमानची पहिली-वहिली जाहिरात! title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सलमान खानची पहिली जाहिरात कोणती असं विचारलं तर यापुढे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आठवले... 

केवळ १५ वर्षांचा असताना सलमाननं 'कोका कोला' या कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीत पहिल्यांदा काम केलं होतं. ही जाहिरात जवळपास १९८५ साली शूट करण्यात आली होती. या शूटवेळी सलमान जाहिरातीसाठी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर उभा राहिल्याचं सांगण्यात येतंय. 

या जाहिरातीत आएशा श्रॉफ म्हणजेच जॅकी श्रॉफची पत्नी आणि टायगर श्रॉफची आईही दिसली होती. सोबतच, आरती गुप्ता सुरेंद्रनाथ, सुनील निश्चल, वनेस्सा, शिराज मर्चेंट यांसारखे प्रसिद्ध मॉडेलही दिसले होते. सलमानची ही जाहिरात अंदमान बेटाजवळ चित्रीत करण्यात आली होती.