रेणुका 'भाभी'नं दिली सलमानच्या सणसणीत कानाखाली!

'हम आपके है कौन' या चित्रपटातील सलमानच्या 'भाभी'ची भूमिका निभावणारी मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं आपल्या सिनेमातील 'देवर'च्या सणसणीत कानाखाली लगावलीय. 

Updated: Jun 22, 2016, 07:10 PM IST
रेणुका 'भाभी'नं दिली सलमानच्या सणसणीत कानाखाली! title=

मुंबई : 'हम आपके है कौन' या चित्रपटातील सलमानच्या 'भाभी'ची भूमिका निभावणारी मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं आपल्या सिनेमातील 'देवर'च्या सणसणीत कानाखाली लगावलीय. 

सलमान खान सध्या पुन्हा एकदा चर्चेत आणि वादात अडकलाय तो त्याच्या सोशल मीडियावर केलेल्या 'रेप' संबंधित कमेंटमुळे... त्याची हीच कमेंट त्याच्या 'भाभी'ला म्हणजेच रेणुकालाही रुचलेली नाही. 

ट्विटरवरच सलमानच्या सणसणीत कानाखाली लगावताना रेणुकानं सलमानला अगोदर माणूस बनण्याचा सल्ला दिलाय.

'अभिनय करताना एखाद्या कलाकाराची त्याला संमती असते... शिवाय या कामाचे त्याला पैसेही मिळतात... पण, बलात्कारात मात्र पीडितेची संमती नसते... बलात्कार पीडित व्यक्तीला त्याची किंमत आयुष्यभर चुकवावी लागते... अगोदर माणूस बना प्लीज!' असं ट्विट रेणुकानं केलंय. 
 

रेणुका नेहमीच तिच्या तडफदार आणि संवेदनशील वक्तव्यांकरता ओळखली गेलीय. सलमानच्या काही जवळच्या व्यक्तींपैंकी ती एक समजली जाते. त्यामुळे, तिनं सलमानची केलेल्या या कानउघडणीनं तरी सलमानला आपली चूक लक्षात येईल, ही अपेक्षा!