जॅकलीनला सलमानकडून मिळाला थ्री-बीचके गिफ्ट?

 सलमान खान सध्या जास्तच खूश आहे, असं वाटावं इतके गिफ्ट तो आपल्या जवळच्या व्यक्तींना वाटत सुटलाय. आता, या जवळच्या व्यक्तींमध्ये जॅकलिनचाही समावेश झालाय. 

Updated: Jul 1, 2014, 04:21 PM IST
जॅकलीनला सलमानकडून मिळाला थ्री-बीचके गिफ्ट? title=

मुंबई : सलमान खान सध्या जास्तच खूश आहे, असं वाटावं इतके गिफ्ट तो आपल्या जवळच्या व्यक्तींना वाटत सुटलाय. आता, या जवळच्या व्यक्तींमध्ये जॅकलिनचाही समावेश झालाय. 

नुकतंच, 'किक'चा संवाद लेखक रजत अरोरा याच्या संवादांनी खुश होऊन एक महागडं घड्याळ सलमाननं त्याला भेट म्हणून दिलं होतं. सिद्धार्थ मल्होत्रा याचा 'एक व्हिलन' या सिनेमातील अभिनय आवडला तर आपल्या हातातलं डिझायनर घड्याळ त्यानं सिद्धार्थला गिफ्ट म्हणून दिलं. 

आता तर सलमान जॅकलीन फर्नांडिसवरही भलताच खुश आहे. सध्या, जॅकलीन बऱ्याचदा सलमानसोबत दिसतेय. नुकताच तीनं ब्रांद्रा स्थित एक थ्री-बीएचके फ्लॅटमध्ये आपलं बस्तान हलवलंय. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हा फ्लॅट जॅकलीनला सलमाननंच भेट म्हणून दिलाय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.