मुंबई : विश्व हिंदू परिषदने नवा वाद निर्माण केलाय. अमिर खान यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलिकडेच भेट घेतली होती. या भेटीत तू मोदी यांची माफी मागितलीस का, अशी विचारणा विहिंपने केली. 2005मध्ये गुजरात दंगलीबाबत केलेल्या वक्तव्यावर ही विचारणा केली.
अमिर खानला शनिवारी विहिंपने एक पत्र लिहिली आहे. विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष अशोक चोगले यांनी पत्र लिहून अमिर खानला विचारले आहे की, 2005मध्ये जे वक्तव्य केले होते. त्यावरून मोदी यांना गुजरात दंगलीबाबत जबाबदार धरले होते. आपल्या मनात हे विचार अजून असतील तर आम्ही तुझ्या विचाराने हैराण आहोत. अशा व्यक्तींनी पंतप्रधानांना भेटण्याचा निर्णय योग्य नाही.
आता प्रश्न उपस्थित होत आहे की, अमिरने मोदींची माफी मागितली की नाही. टि्वटरवर तू पोस्ट केलेल्या प्रतिक्रियेवरुन तू मोदींची माफी मागितलेली नाही, असं वाटत आहे. जर पुन्हा पंतप्रधान यांना तो भेटला तर तो काहीतरी लाभ उठविण्यासाठी भेटतो, असा संदेश जाईल, अशी भीती विहिंपने व्यक्त केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.