नवी दिल्ली : सुलतान चित्रपटावेळी सीन शूट केल्यानंतर मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं, असं धक्कादायक वक्तव्य सलमान खाननं केलं होतं. सलमानच्या या वक्तव्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका झाली होती. या वक्तव्यामुळे सलमानच्या अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
रियो ऑलिम्पिकसाठी सलमान खानची गुडविल अॅम्बेसेडर पदी निवड झाली होती, पण आता इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन सलमानची या पदावरून हकालपट्टी करण्याची शक्यता आहे. सलमानचं हे वक्तव्य भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंची प्रतिमा खराब करणारं आहे. सलमानच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होऊ नये म्हणून आम्हाला सलमानच्या या नियुक्तीवर विचार करावा लागेल, असं असोसिएशननं सांगितलं आहे.
सलमाननं माफी मागितली नाही, तर सलमानची गुडविल अॅम्बेसेडर पदावरून हकालपट्टी होऊ शकते, असे संकेतच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं दिले आहेत.