सल्या, लंगड्या आणि गाढवाचं दृश्य वास्तवातलं

सैराटमधील सल्या आणि लंगड्याचं गाढवावर बसण्याचं दृश्य अधिक मजेदार झालं, पण यात आणखी एक अशी गंमत घडली की दिग्दर्शक नागराजने सांगितलं, हे दृश्य असंच राहू द्या.

Updated: May 17, 2016, 02:04 PM IST
सल्या, लंगड्या आणि गाढवाचं दृश्य वास्तवातलं  title=

मुंबई : सैराटमधील सल्या आणि लंगड्याचं गाढवावर बसण्याचं दृश्य अधिक मजेदार झालं, पण यात आणखी एक अशी गंमत घडली की दिग्दर्शक नागराजने सांगितलं, हे दृश्य असंच राहू द्या.

चित्रपटात आर्ची आणि परशा घोड्यावर बसल्‍याचा एक सिन आहे. त्‍या नंतर लगेचच लंगड्या-तानाजी गलंगडे) आणि सल्‍या-अरबाज शेख गाढवावर बसण्‍याच्‍या प्रयत्‍नात खाली पडताना दाखवले. तर ते दाखवले गेलेले नाहीत ते खरोखर पडले आहेत.

दिग्‍दर्शकाला खरे तर या ठिकाणी त्‍यांना गाढवावर बसलेले दाखवायचे होते. परंतु, गाढवावरून पडल्‍याचा सिन गंमतीशीर आणि वास्‍तववादी झाला. तो तसाच ठेवण्‍यात आला, आणि या दृश्यानेही प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं.