नागराजच्या नावाने फिरतायत या अफवा

सैराट सिनेमा पडद्यावर आल्यापासून, दिग्दर्शक नागराज मंजुळे चर्चेत आला नाही, असा एकही दिवस जात नाहीय.

Updated: May 18, 2016, 10:29 PM IST
नागराजच्या नावाने फिरतायत या अफवा title=

मुंबई : सैराट सिनेमा पडद्यावर आल्यापासून, दिग्दर्शक नागराज मंजुळे चर्चेत आला नाही, असा एकही दिवस जात नाहीय.

नागराजसाठी आजचा दिवस वाद विरहित असेल असं वाटत असतानाच नागराजच्या नावाने व्हॉटस अॅप ट्वीटरवर अफवा पसरत आहेत.

नागराजने 'नाम' फाऊंडेशनला २ कोटी रूपये दिले, म्हणून नागराजचे खूप सारे धन्यवाद, तसेच चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला तो प्रत्येकी १ कोटी रूपये देणार असल्याच्या अफवा व्हॉटसअॅपवर पसरत आहे.

सैराट सिनेमाची निर्मिती ही झी स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शनची निर्मिती आहे. याचा कोणताही विचार न करता, सर्वकाही पैसे नागराज मंजुळे यांना मिळणार आहेत, या विचारानेच या अफवा पसरत असल्याचं सांगण्यात येत आहे.