मुंबई : महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.
सिनेमाने आतापर्यंत ५५ कोटींची कमाई केली आहे. आर्ची आणि परश्याच्या जोडीने सगळ्यांना हा सिनेमा पाहण्यास याड लावलं आहे. प्रेक्षक ३-३ वेळा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहातायंत. सिनेमा अजूनही अनेक ठिकाणी हाऊसफूल आहेत.
यापूर्वी नटसम्राटने ४० कोटींची कमाई करत नवा विक्रम नोंदवला होता. मात्र सैराटने आतापर्यंत ५५ कोटींची विक्रमी कमाई करत पहिला सुपरहिट सिनेमा ठरला आहे.