आंतरराष्ट्रीय मॅगझिनने घेतली 'सैराट'ची दखल

आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला सैराट.

Updated: May 14, 2016, 08:56 PM IST
आंतरराष्ट्रीय मॅगझिनने घेतली 'सैराट'ची दखल title=

मुंबई : महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत. 

महाराष्ट्रातील घराघरात चर्चेत असणाऱ्या सिनेमा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील स्वत:ची दखल घ्यायला लावणारा ठरला आहे. जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिननेही सैराटची दखल घेतली आहे. फोर्ब्स मॅगझिन हे जगातील अतिशय प्रसिद्ध मॅगझिन आहे. फोर्ब्सने या सिनेमाची दखल घेतल्यामुळे या सिनेमाच्या यशात आणखी भर पडली आहे.

सैराटने ५० कोटींचा टप्पा गाठल्यानंतर आता तो १०० कोटींचा ठप्पा गाठणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे.