"तैमूर"वर सैफने सोडले मौन! सांगितला अर्थ आणि का ठेवले नाव

 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांच्या नवजात मुलाच्या नावावर गेल्या काही दिवसांपूर्वी खूप वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अनेकांनी तैमूर नाव ठेवल्यावर टीका केली होती. 

Updated: Jan 17, 2017, 04:08 PM IST
"तैमूर"वर सैफने सोडले मौन! सांगितला अर्थ आणि का ठेवले नाव  title=

नवी दिल्ली :  बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांच्या नवजात मुलाच्या नावावर गेल्या काही दिवसांपूर्वी खूप वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अनेकांनी तैमूर नाव ठेवल्यावर टीका केली होती. 

सैफ आणि करिना यांनी आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले. सैफने पहिल्यांदा एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या नावावर मौन सोडले. तसेच त्याने सांगितले की असे नाव का ठेवले आहे. 

सैफ अली खानने इंग्रजी वृत्तपत्र मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्याला तुर्कीचा राजाला ओळखतो. सैफ म्हटला की तुर्कीश राजाचे नाव तिमूर होते. तैमूर नाही. माझ्या मुलाचे नाव तैमूर आहे तिमूर नाही. त्यामुळे माझ्या मुलाचे नाव तुर्कीच्या राजाशी जोडणे चुकीचे आहे. ही गोष्ट खरी आहे की दोन्ही शब्द एका शब्दापासून आले आहेत. पण नाव एक नाही. 

सैफने आपल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा आम्हांला मुलगा झाला तेव्हा करिना आणि मला तैमूर नाव आवडले. त्यामुळे आम्ही हे नाव ठेवले. माझ्या पेक्षा हे नाव करिना आवडले होते. मला वाटते की ज्यावेळेस मी माझ्या मुलाचे नाव तैमूर ठेवले त्याचवेळी मी चित्रपटांप्रमाणे डिस्क्लेमर द्याला पाहिजे होते. याचे नाव कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंधीत नाही आहे. 

तैमूरचा अर्थ सांगताना तो म्हणाला, याचा अर्थ लोह किंवा लोखंड असे होते. लोक इतिहासाचे ज्ञान देतात तर अलेक्झँडर आणि अशोकच्या नावाशीही हिंसक इतिहास जोडला गेला आहे. पण तरीही लोक मोठ्या अभिमानाने आपल्या मुलाचे नाव अशोक ठेवतात आणि कोणीही अशोक प्रमाणे वागत नाही. मला संपूर्ण खात्री आहे की माझा मुलगा तैमूर हा प्रेम, शांती आणि चांगल्या शिकवणीसह मोठा होईल आणि तो उदारमतवादी असणार आहे.