झहीरला डेट करण्याबाबत पहिल्यांदाच बोलली सागरिका

'चक दे इंडिया'ची अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्यांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलेय. याबाबत पहिल्यांदाच सागरिकाने विधान केलंय. 

Updated: Feb 9, 2017, 10:16 AM IST
झहीरला डेट करण्याबाबत पहिल्यांदाच बोलली सागरिका title=

मुंबई : 'चक दे इंडिया'ची अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्यांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलेय. याबाबत पहिल्यांदाच सागरिकाने विधान केलंय. 

झहीर खानला डेट करण्याबाबत सागरिकाला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, ही आमची खाजगी बाब आहे आणि मला या गोष्टीवर कोणतीही चर्चा नाही करायचीये. 

युवराज आणि हेझल यांच्य़ा लग्नात सागरिका आणि झहीर एकत्र दिसले होते. त्यानंतर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 

सागरिकाने चक दे इंडियामध्ये एका प्लेयरची भूमिका बजावली होती. २००७मध्ये तिला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी पुरस्कारही मिळाला होता.