दुसऱ्या दिवशीही 'मोहेनजो दारो'वर रुस्तम भारी

मोहेनजो दारो आणि रुस्तम हे दोन्ही चित्रपट शुक्रवारी रिलीज झाले आहेत.

Updated: Aug 14, 2016, 06:59 PM IST
दुसऱ्या दिवशीही 'मोहेनजो दारो'वर रुस्तम भारी  title=

मुंबई : मोहेनजो दारो आणि रुस्तम हे दोन्ही चित्रपट शुक्रवारी रिलीज झाले आहेत. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही हृतिकच्या 'मोहेनजो दारो'वर अक्षय कुमारचा 'रुस्तम' भारी पडला आहे. 

दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रुस्तमनं 16.43 कोटी रुपये कमावले तर मोहेनजो दारोनं 9.75 कोटींचा गल्ला जमवला. दोन दिवसानंतर रुस्तमनं एकूण 30.45 कोटी रुपये तर मोहेनजो दारोनं 18.50 कोटी रुपये कमावले आहेत. 15 ऑगस्टला असलेल्या सुट्ट्यांमुळे रुस्तमला आणखी फायदा होऊ शकेल, असं बोललं जात आहे.